Income tax update : कार्ड 1 एप्रिल 2023 पर्यंत आधारशी न जोडल्यास पॅन कार्ड होणार निष्क्रिय ! वाचा सविस्तर

 


        नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आयकर विभागाने आता जाहीर केले आहे की,पुढील वर्षीच्या मार्च अखेर पर्यंत जर पॅन कार्ड आधार कार्डशी सलग्न किंवा जोडले गेले नाही तर,असे पॅन कार्ड निष्क्रिय केले जातील आयकर विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सल्ला पत्रात ही घोषणा काल दि.24 डिसेंबर 2022  शनिवार रोजी आयकर विभागाने केली आहे.

 काय म्हटले आहे या आयकर विभागाच्या सल्ला पत्रात

       आयकर विभागाने म्हटले आहे की पॅन कार्ड क्रमांक आधार कार्डशी जोडणे आता बंधनकारक करण्यात आले  आहे. तेव्हा नागरिकांनी या गोष्टीसाठी उशीर करू नये आयकर विभागाने म्हटले आहे की आयकर कायदा 1961 नुसार सवलतीच्या श्रेणीमधील पॅन कार्ड धारक वगळता  इतर सर्व पॅन कार्ड धारक हे 31 मार्च 2023 पूर्वी आपले आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक झाले आहे.नसता आपले पॅन कार्ड दिनांक 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय करण्यात येईल असे या सल्लापत्रात आयकर विभागाने सांगितले आहे.

सवलतीच्या श्रेणीतील व्यक्तींना हा नियम लागू नाही कोण आहेत सवलतीच्या श्रेणीतील. 

    मे 2017 रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये सवलत श्रेणीतील व्यक्तींची ही यादी होती. त्या यादीनुसार आसाम, जम्मू कश्मीर, मेघालय या राज्याचे रहिवाशी आयकर कायदा 1961 नुसार अनिवासी नागरिक 80 वर्षाचे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले नागरिक तसेच भारताचे नागरिक नसलेल्या विदेशी व्यक्ती यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीतील लोकांना पॅन कार्ड आधारशी जोडण्यात पासून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना दिनांक 24 डिसेंबर 2022 शनिवारचे सल्ला पत्र लागू नाही.


पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर अशा येतील अडचणी

जर पॅन कार्ड वरील दिलेल्या तारखे अगोदर सलग्न किंवा जोडले गेले नाही तर पॅन कार्ड वर कारवाई होऊ शकते व ते निष्क्रिय होऊ शकते. हे कार्ड जेव्हा निष्क्रिय झाले असेल तेव्हा आपणास अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. यामध्ये प्रलंबित विवरणपत्रकात प्रक्रिया  होणार नाही, व कर हा जास्त वाढीव दराने भरावे लागेल. अशा व्यक्तींना बँका आणि अन्य वित्तीय पोर्टलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.




टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने