नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी म्हणून या विभागामध्ये लवकरच 13 हजार 400 पदे भरण्यात येणार आहे ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पुढे ही पदे भरली जाणार आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महाजन म्हणाले की ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू झाली आहे येणाऱ्या वर्षी एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांसाठी निवड करून ही पदे भरली जातील असे ते म्हणाले.
ग्रामविकास विभागामध्ये शासकीय कामे ही संथ गतीने होत होती.अपुऱ्या पदांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या आल्याने या विभागातील कामे संत गतीने होत होती यामुळे आता राज्य शासनाने लवकरच 13 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या पदांसाठी जागेचा तपशील व लवकरच ही पदे भरण्यात येतील असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.