राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे सिल्लोड येथे 1 ते 5 जानेवारी दरम्यान आयोजन! जास्तीत जास्त शेतकऱ्या नी लाभ घ्यावा.

     


              नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो कृषीमंत्री  मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या  पुढाकारातून सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . १ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान हा महोत्सव होणार आहे . यात शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती आणि प्रगत तंत्रज्ञान सादर करण्यात येणार असल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात भेट द्यावी असे आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार व कृषि विभागाने केले आहे .

● कृषी विद्यापीठांचे सादरीकरण

          स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून,या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने हो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावित,यासाठी राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित केल्याची अशी माहिती देण्यात आली आहे . महात्मा फुले कृषी विद्यापीठ ( राहूरी ) , डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ( अकोला ) , डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , ( दापोली ) , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ( परभणी ) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने कृषी विभागाची प्रात्यक्षिके , परिसंवाद , तंत्रज्ञान , राज्यातील शेतकऱ्याच्या यशोगाथांचे सादरीकरण होणार आहे . महोत्सवातील प्रात्यक्षिकांमध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती , एकात्मिक पीक व्यवस्थापन , एकात्मिक कीटक व्यवस्थापन , एकात्मिक शेती व्यवस्थापन , सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत , अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

● विविध चर्चासत्रांचे आयोजन

              आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून साजरे होणार आहे . यामध्ये महाराष्ट्राची भूमिका महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही चर्चासत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे . कृषी विद्यापीठाच्या समन्वमाने आंबा , संत्रा , मोसंबी भेंडी , टोमॅटो , सोयाबीन , कापूस मका इत्यादी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे . पाच दिवसांमध्ये वेगवेगळी कृषीविषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे .

● पिकांबाबत मार्गदर्शन 

                              कापूस , सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट त्यासंबंधीचे संशोधन , नवीन वाणाचे संशोधन , बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेले संशोधन याचेही सादरीकरण महोत्सवात होणार आहे . कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन , पोकरा , स्मार्ट काढणी, पाश्चिमात्य तंत्रज्ञान , फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे.  बाजारपेठाचे नवीन तंत्रज्ञान ,ड्रोन तंत्रज्ञान याची सुद्धा माहिती दिली जाणार आहे . तेव्हा जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मंत्रालयातर्फे  करण्यात आले आहे.

 ● कृषी महोत्सवासाठी संपर्क 

महोत्सवाचे यशस्वी आयोजना करण्यासाठी संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील ( ९४२२४३०२७८ ) यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी , तसेच तुकाराम मोटे , कृषी सहसंचालक ( ९४२२७५१६०० ) यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली .

वृत्तपत्रावरील माहिती बातमी वाचा

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने