तरुण उद्योजकांना मिळणार आता दहा ऐवजी पंधरा लाख रुपये ! अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा निर्णय ! वाचा सविस्तर !

 


                 नमस्कार मित्रांनो की KJ MEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार , स्वयंरोजगार व स्वबळावर उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब आर्थिक महामंडळ युवकांना मदत करत असते या संस्थेमार्फत अनेक मराठा उद्योजकाना कर्ज देऊन,अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय करण्यात यशस्वी झाले आहेत.आहेत परंतु आता तरीही भरपूर असे  मराठा युवक आहेत ज्यांना उद्योग तर करायचे आहेत. मात्र कुणाचे पाठबळ किंवा आर्थिक मदत असण्याची गरज आहे. यासाठीच अण्णासाहेब आर्थिक महामंडळची कर्ज योजना आहे. मराठा समाजातील उद्योगाभिमुख असणाऱ्या तरुणांना महामंडळ दहा लाख रुपये देत होते.परंतु आता ही रक्कम 10 लाख ऐवजी 15 लाख रुपये झाली आहे व व्याज परतावा मुदत 5 वर्षांवरून 7 वर्ष झाली आहे. त्यामुळे आता नव उद्योजक तरुणांना यामुळे अधिकचे भक्कम आर्थिक पाठबळ मिळणार आहे व त्यांचे उद्योग उभारणीचे स्वप्न साकार होणार आहे.

तीन प्रकारची कर्ज योजना

nbsp;    राज्यातील आर्थिक मागास घटकांसाठी 28 ऑगस्ट 1998 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळची स्थापना झाली . परंतु  निधी अभावी महामंडळावर कर्ज वाटपाच्या अनेक मर्यादा होत्या तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालून या महामंडळास आर्थिक मदत करण्याचे ठरवले. व या महामंडळास भरीव निधीची तरतूद केली. त्यानंतर महामंडळाने दिनांक 2 फेब्रुवारी 2018 रोजी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान चालू केले. या अभियानात वैयक्तिक कर्ज , गट कर्ज ,गट प्रकल्प अशा तीन पद्धतीची कर्ज योजना सुरू केली. या गट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्याची शिफारस व व्याज परताव्याची तरतूद करून ठेवली आहे. महामंडळातर्फे मिळत असलेल्या बिनव्याजी कर्ज योजनेमुळे आतापर्यंत चार वर्षात हजारो युवक उद्योगशील बनले आहे. मराठा युवकांना या कर्ज योजनेचा मोठा लाभ मिळत असून यामुळे नवीन  उद्योजकांना उद्योग करण्यासाठी नवीन चेतना निर्माण होत आहे.

इच्छुक या अगोदर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा

        सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतवा योजनेअंतर्गत असलेली जास्तीत जास्त वयाची अट रद्द करण्यात आली असून याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात  मराठा समाजातील नव उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी बँकेतर्फे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज पुरवले जाते.या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी यापूर्वी या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशा नियमांचे पालन करूनच योजनेचा लाभ मिळणार आहे.

 गट कर्ज व्याज परतावा योजना

                 गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाच्या परतफेड कालावधी पाच वर्षासाठी निर्धारित केला आहे योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासवट घटकातील उमेदवारांच्या बचत गट भागीदारी संस्था सहकारी संस्था कंपनी अशा संस्थांना बँकेतर्फे उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवले जाते.

कोण कोणती लागतात कागदपत्रे व कुठे करावा अर्ज

       अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागेलं आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व जातीचा प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट आपणास द्यावे लागतील.

वर्तमानपत्रातील बातमी वाचा 


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने