नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखा मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी द्वारे घेण्यात येणार आहे. यासाठी सध्या रिक्त असलेली पदे आणि पुढे खाली होत असलेली पदे यांचे मागणी पत्र या विभागाकडून लवकरात लवकर पाठवण्याचे निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी राज्यातील या विभागांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
जानेवारीच्या प्रथम आठवड्यात निघणार जाहिरात
एमपीएससीने १ जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजीत वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये लिपिक टंकलेखक वर्गातील राजपत्रित पदे वर्ग गट ब व वर्ग गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून प्रस्तावित असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत या सर्व विभागांनी पदांचे प्रस्तावित मागणी पत्र आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
एमपीएससी मुळे परीक्षा पारदर्शक होणार
पूर्वी या पदांसाठी भरती प्रक्रिया ही खाजगी संस्थांमार्फत करण्यात येत होती परंतु या भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार आढळल्याने परीक्षार्थी मध्ये नाराजी होती व या संस्थां विरोधात परीक्षार्थींनी तक्रार दाखल केल्या होत्या आणि शासनाला या परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे शासनाने ही परीक्षा आता एमपीएससी मार्फत घेण्याचे आदेशित केले आहे. आता ही परीक्षा एमपीएससीमार्फत घेत असल्यामुळे परीक्षाही पारदर्शी होईल असा विश्वास परीक्षार्थींना आहे.
मागणी पत्र वेळेत न आल्यास पद भरती नाही
या विभागामार्फत जर 15 डिसेंबर पर्यंत प्रस्तावित पदांचे परिपूर्ण मागणी पत्र आयोगाला सादर न झाल्यास लिपिक टंकलेखक या विभागातील पदे भरायची नाहीत असे गृहीत धरून ही भरती प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रक किंवा 2023 यावर्षी होणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे.