नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एक नवीनच बातमी आपल्याला आम्ही सांगत आहोत. मलाही आता पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात भाग घेताना दिसत आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आता उद्योग असतील व्यवसाय असतील किंवा नोकरी असतील किंवा भारतीय सैन्य दल यामध्येही आता महिला सहभाग वाढला आहे याच धर्तीवर आता भारतीय नौदलाच्या मार्कोस तर हवाई दलाच्या गरुडा या घातक कमांडो दलामध्ये आता महिलांनाही स्थान मिळनार आहे. वाचूया सविस्तर खालील प्रमाणे.
ताज हॉटेलवरील हल्ल्यापासून भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडो जगाला माहिती झाले . या कमांडोंनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुकाबला करताना हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो जगातील युद्धकौशल्यातील मानाचे पान समजले जाते . विविध देशांच्या कमांडो प्रशिक्षणात त्याचा सातत्याने गौरवाने उल्लेख केला गेला आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुडा या विशेष कमांडो पथकात महिला कमांडोंचा लवकरच समावेश केला जाणार आहे . मात्र त्यासाठी त्यांना अतिशय कठोर समजल्या जाणाऱ्या चाचण्यांतून यशस्वीपणे जावे लागणार आहे . भारतीय सैन्य दलासाठी हा ऐतिहासिक निर्णय असून जगातील सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या या घातक कमांडो फोर्सचा लौकिक वाढणार आहे . भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही महिलांच्या शाखांत प्रतिनिधित्वाबाबत एकेक निर्णय घेत आता देशाचे सैन्य दल घातक युद्धकौशल्य असणाऱ्या महिलांना आणखी एक आव्हान खुणावणार आहे . या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
अमेरिकेच्या मरिन कमांडो आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही कमांडो युनिटखालोखाल मार्कोसचे नाव घेतले जाते . या मार्कोस दलात आता महिला कमांडो सामील होणार आहेत . मात्र या दलात समाविष्ट होण्यासाठी अत्यंत कठोर अशा चाचण्यांतून जावे लागणार आहे. सर्वच कमांडोंना या चाचण्या अत्यावश्यक असतात . त्यातून उत्तीर्ण कमांडो होणाऱ्यांचे प्रमाण अवघे २० टक्के असते .
मार्कोसने आतापर्यंत श्रीलंकेतील लिट्टेविरोधी मोहीम , जम्मू काश्मीरमधील अतिरेकीविरोधी महिलांना मोहिमा , हिंद महासागरातील समुद्री चाचेविरोधी मोहिमा , लेहमधील तैनाती आदी मोहिमा हाताळल्या आहेत . त्यातील ताज हॉटेल कारवाई मोहीम सर्वाधिक प्रकाशझोतात आली . नौदलाच्या पाठोपाठ हवाई दलाच्या गरुड या कमांडो दलातही महिला कमांडोंच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे . त्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे . मार्कोसचे तळ विशाखापट्टणम , गोवा , कोची आणि पोर्ट ब्लेअर येथे राहणार आहे .