A scientist's discovery:आता पाहता येणार कृत्रिम डोळ्यांनी जग ! शास्त्रज्ञांनी तयार केला नैसर्गिक सारखा कृत्रिम डोळा ! वाचा सविस्तर

     


              नमस्कार मित्रांनो KJ MEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज आपण शास्त्रज्ञा नी  नवीन लावलेल्या शोधाबद्दल जाणून घेणार आहोत. ही बातमी दैनिक पुढारी या वृत्तपत्रावरील बातमीपत्रानुसार ही माहिती आहे.त्यांनी असे लिहिले आहे की लंडन युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम डोळा तयार केला असून , तो नैसर्गिक मानवी डोळ्याप्रमाणे काम करेल . याला शास्त्रीय परिभाषेत ' थ्री - डी मिनी आय असे संबोधले जाते.

नैसर्गिक मानवी डोळ्यांप्रमाणे करेल काम

           हा कृत्रिम डोळा बनवण्यासाठी मानवी त्वचेचा वापर करण्यात आला असून , त्यामध्ये डोळ्याची बाहुली आणि दृष्टिपटलदेखील आढळते.शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार , याआधी कृत्रिम डोळा तयार करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींवर संशोधन करण्यात आले होते . तथापि , त्याचा फायदा झाला नव्हता . मात्र मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या मिनी आयमधून प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम डोळा तयार केला असून , तो नैसर्गिक मानवी डोळ्याप्रमाणे काम करेल याला शास्त्रीय परिभाषेत ' थ्री - डी मिनी आय असे संबोधले जाते. 

                                               एखाद्या व्यक्तीची पाहण्याची क्षमता कशामुळे जाते , हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत . याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनुवांशिक आजारांसंदर्भात संशोधनही सुरू आहे यामुळे भविष्यात डोळ्यांसंबंधित आजारांवरील उपचारात मदत होऊ शकेल . 

 व्यक्तीला पाहण्यास व प्रतिमा तयार करण्यास मदत    

                      शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार , मिनी आयवरील संशोधनामुळे वयाच्या पन्नाशीनंतर होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांवर निश्चितपणे उपाय शोधला जाऊ शकतो ' स्टेम सेल रिपोटर्स जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार हा थ्री - डी मिनी डोळ्यातील रॉड सेल्स म्हणजेच दंड पेशी डोळ्यांच्या दृष्टिपटलामध्ये तयार करण्यात आल्या आहेत . डोळ्यांच्या मागील भागात या पेशी आढळतात . कोणत्याही व्यक्तीला वस्तू पाहण्यास किंवा त्याचे दृश्य अथवा प्रतिमा तयार करण्यास मदत करणे हे या पेशींचे मुख्य कार्य होय . या पेशीमुळे प्रतिमा पाहणे सुलभ होत जाते . प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डोळ्यांमध्येही अशा प्रकारची तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांनी यावर अशाप्रकारे केले काम 

            लंडन च्या डेली मेल'च्या वृत्तानुसार , मिनी आय तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अशर सिंड्रोमने पीडित तरुण रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या . यापासून स्टेम सेल्स तयार करण्यात आले . त्यानंतर प्रयोगशाळेत कृत्रिम डोळा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली यामध्ये शास्त्रज्ञांनी हळूहळू संशोधन करत कृत्रिम डोळयात सात प्रकारच्या पेशी तयार केल्या , ज्याचा पातळ थर प्रकाश ओळखून प्रतिमा तयार करू शकतो . 

                 माहिती सौजन्य:- दैनिक पुढारीचे 29 नोहेंबर चे वृत्तपत्र

                    

👇👇अशा अनेक माहिती साठी ग्रुप ला जॉईन व्हा 👇👇?



टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने