नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहिती आहे की, मोबाईल तंत्रज्ञान हे किती अवगत झालेले आहे. मोबाईल मुळे आज सर्वच जग जवळ आलेले आहे. त्यामुळे मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.मोबाईल मुळे अनेक सोयी सुविधा आपणास मिळत आहे . बँकिंग क्षेत्र, सोशल मीडिया, अशी अनेक क्षेत्रे आहे .यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर व व्हाट्सअप हे फार लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. कंपन्या ह्या सर्व प्लॅटफॉर्मवर नवनवीन अपडेट देत असतात व या प्लॅटफॉर्मला अधिका अधिक सोपे करण्यासाठी सुविधा देत असतात.यामध्येच आता नुकतेच व्हाट्सअप या प्लॅटफॉर्मने एक नवीन फीचर आता आणले आहे.ते म्हणजेच पूर्वी एका मोबाईल मध्ये एकच अकाउंट उघडू शकत होतो.
व्हाट्सअप ने एक मोठा बदल केला असून, आता आपणाला एकाच मोबाईल नंबर चे व्हाट्सअप खाते चार फोनवर वापरता येणार असून, सध्या व्हाट्सअप वेब च्या मदतीने एकाच अकाउंटला फोन आणि पीसीवर वापर आपण व्हाट्सअप वापरू शकतो. आता हे फीचर मोबाईल साठी ही उपलब्ध होणार आहे.
व्हाट्सअप ची मूळ कंपनी मेटा चे सीईओ मार्क झुकेर बर्ग यांनी नवीन फिचारची माहिती दिली दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअप चे हे फीचर काही आठवड्यात सर्वा पर्यंत पोहोचेल त्यांनी लिहिले की,आता तुम्ही एकाच वेळी चार फोनवर व्हाट्सअप लॉगिन करू शकाल.
कसे वापराल हे फीचर
जर व्हाट्सअप वापर कर्त्याला एका मोबाईलसह इतर मोबाईलवरही व्हाट्सअप वापरायचे असेल,तर त्याला दुसऱ्या मोबाईल मधील व्हाट्सअप ऍप्लिकेशनवर जाऊन पहिल्या मोबाईलचा फोन नंबर टाकावा लागेल. यानंतर पहिल्या फोनवर ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इतर मोबाईलवरही लॉगिन करू शकाल. त्याचवेळी पहिल्या मोबाईल मधील कोड स्कॅन करून इतर उपकरणे देखील जोडले जाऊ शकतात.
काय आहे नवीन पिक्चर
1) व्हाट्सअप या नवीन पिक्चर मध्ये तुम्ही एकाच वेळी चार मोबाईलवर एकच व्हाट्सअप खाते वापरून लॉगिन करू शकाल.
2) पहिल्या मोबाईल मध्ये नेटवर्क नसताना, व्हाट्सअप वापर करते ,इतर दुसऱ्या मोबाईलवर व्हाट्सअप चे संदेश पाठवून वाचण्यासह इतर कामे करू शकतील.
3) वापरकर्त्याला मेसेज येईल तसेच तो पाठवूही शकेल.
4) परंतु वापरकर्त्याच्या पहिल्या मोबाईल मधील व्हाट्सअप अकाउंट दीर्घकाळ निष्क्रिय राहिलास, व्हाट्सअप अकाउंट इतर मोबाईल मधून आपोआप लॉग आऊट होऊन जाईल.