PM-WANI:आता रेशन दुकानात लागणार वाय फाय ! स्वस्त दरात नागरिकांना मिळणार इंटरनेट ! वाचा सविस्तर



                        नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो जग हे इंटरनेटमुळे अगदी जवळ आले आहे या इंटरनेट तंत्रज्ञानामुळे खूप मोठी क्रांती घडली आहे.ती कॉम्प्युटर क्षेत्रात असो किंवा मोबाईलच्या क्षेत्रात असो इंटरनेटमुळे आपल्या जीवनाला एक वेगवान गती मिळाली आहे. तेव्हा इंटरनेट हे आता आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक बनले आहे. इंटरनेटमुळे आपले बँकिंग क्षेत्र असो किंवा सोशल मीडिया अशी अनेक क्षेत्रे ज्यामुळे आपणाला आपला प्रचार व व्यवहार करण्यासाठी एकदम सोपी पद्धत निर्माण झाली आहे. इंटरनेट हे भारतामध्येही जवळपास सर्वत्र पोहोचले आहे परंतु भारतामध्ये असाही काही भाग आहे ज्यामध्ये अजून पर्यंत इंटरनेटची साधने किंवा इंटरनेटचे नेटवर्क पोहोचलेले नाही त्यामुळे अशा क्षेत्रांसाठी भारत सरकारने एक नवीन योजनेच्या अंतर्गत घोषणा केली आहे. जी म्हणजे पीएम वाणी योजना ज्यामुळे वायफायद्वारे अशा दुर्गम भागातील क्षेत्रांना कमी दरात इंटरनेट देण्याचे उद्दिष्ट आहे. 

                   सार्वजनिक ठिकाणी परवडणाऱ्या दरात वाय फाय इंटरनेट मिळेल . ऑनलाईन शिक्षणाला मदत होईल . ग्रामीण भागात तसेच जेथे इंटरनेट सुविधा कमी अथवा नगण्य आहे तिथे ही सुविधा उपलब्ध होईल . वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांचेही उत्पन्न वाढेल , जीवनशैली सुधारेल रोजगार वाढेल अशी अपेक्षा आहे .

वाय-फाय द्वारे पुरवणार इंटरनेट

       ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना घराजवळ इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी , यासाठी राज्यात पीएम वाणी ' योजना राबविली जाणार आहे . या योजने अंतर्गत रेशनधान्य दुकानांतून वाय - फाय इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे . दुकानांच्या २०० मीटर परिघापर्यंत अल्पदरात नागरिकांना वाय - फाय इंटरनेट सेवा मिळणार आहे . देशात इंटरनेटचा वापर वाढत असला , तरी ग्रामीण व शहरी विभाजन अजूनही कायम आहे . ग्रामीण भागात ग्राहकांची संख्या जास्त आहे . तेथील इंटरनेट घनता शहरी भागातील इंटरनेटच्या घनतेच्या फक्त एकतृतीयांश आहे .  

देशातील अनेक राज्यातील जिल्ह्यात योजना सध्या चालू 

                    डिजिटल इंडियानंतर आता वाय फाय क्रांती केली जात आहे . यामुळे इंटरनेट ही आता अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे ग्रामीण , दुर्गम भागातील नागरिकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी , याकरिता केंद्र शासनाने पीएम वाणी ' योजना सुरू केली आहे . या योजनेंतर्गत सार्वजनिक डेटा केंद्रे सुरू केली जाणार असून , त्याद्वारे परिसरात वाय - फाय इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे . सार्वजनिक डेटा केंद्र म्हणून रास्तभाव धान्य दुकानांना मान्यता देण्यात आली आहे . मध्य प्रदेशातील उज्जैन , उत्तर प्रदेशातील दहा जिल्हे , उत्तराखंडमधील डेहराडून , आंध्र प्रदेशातील कर्तुल येथील धान्य दुकानांत या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे .

 फक्त 99 रुपयात दीड जिबी  डाटा

                      राज्यातील सात जिल्ह्यात ही योजना सुरू केली जानार असून , अन्य जिल्ह्यांतील दुकानदार इच्छुक असतील , तर तिथेही पहिल्या टप्प्यातच ही योजना सुरू केल जाईल , असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे . या योजनेच्या माध्यमात सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल चॅनेल सुरू केले जाणार आहे . या निर्णयामुळे अति दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक , विद्यार्थी व्यापारी विक्रेते आदी सर्वांना दररोज एक ते दीड जीबी डेटा मिळणार आहे . त्याकरिता महिन्याभरासाठी ९९ रुपये खर्च येणार आहे . यामुळे याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. रेशनधान्य दुकानदारांनाही त्याचा मोठा फायदा होनार आहे.

वृत्तपत्रावरील बातमी वाचा

1 टिप्पण्या

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने