बाहेरगावी असलेल्या मतदारांना आता तिथूनच करता येणार आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना मतदान ! निवडणूक विभागाची नवीन माहिती ! वाचा सविस्तर

 


                नमस्कार मित्रांनो आज नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो निवडणूक विभागाने आता स्थलांतरित मतदारांसाठी एक नवीन शक्कल लढवली आहे जी म्हणजे मतदारांना आता मतदान करण्यासाठी आपल्या स्वगृही न जाता मतदाता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहूनच मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक विभाग करणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी त्यांच्या मूळ राहत्या ठिकाणी न जाता त्याच्या कामाच्या ठिकाणा जवळ असलेल्या मतदान बुथवर च मतदान करता येणार आहे.

             देशांतर्गत स्थलांतरण करणाऱ्या स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक आयोगामार्फत तयारी करण्यात येत आहे. यामुळे स्थलांतर करणाऱ्या मतदाराने मतदान करण्यासाठी आपल्या गृह राज्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. याबाबतच्या कायदेशीर, परीचालानात्मक, प्रशासकीय व तंत्रज्ञान विषयक आव्हानांबाबत भारतीय निवडणूक आयोगाने संकल्पना दस्तऐवज तयार केला असून सदर दस्तैवजावर आयोगाने राजकीय पक्षांचे अभिप्राय मागविले आहेत. भारत निवडणूक आयोगाचे संयुक्त संचालक श्री.अनुज चांडक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

दूरस्थ इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राने (RVM) मतदान

       भारत निवडणूक आयोगाने बहु – मतदारसंघीय दूरस्थ इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राचा (RVM) नमुना विकसित केला आहे. हा दूरस्थ इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राच्या प्रात्यक्षिकासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या दूरस्थ इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रामुळे एकाच दूरस्थ मतदान केंद्रावरून अनेक मतदारसंघातील मतदान हाताळता येणार आहे.  

स्थलांतरामुळे ३० कोटी जनता मतदानापासून वंचित

                    आजच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात स्थलांतरामुळे मतदान अधिकारापासून वंचित ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही. सन २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ६७.४ % इतके मतदान झाले होते. म्हणजेच सुमारे ३० कोटीच्या पेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावत नाहीत असे आढळून आले होते. तसेच भिन्न राज्यांमध्ये मतदानाच्या विभिन्न आकडेवारीबाबत भारतीय निवडणूक आयोगाने आपली चिंता वेळोवेळी व्यक्त केली आहे. 

शिक्षण, नोकरी आणि विवाह स्थलांतराचे प्रमुख घटक 

        मतदाराची आपल्या नविन निवासस्थानाच्या जागी मतदार म्हणून नाव नोंदणी न करण्याची बहुविध कारणे असून त्यामुळे तो मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतो. अंतर्गत स्थलांतरामुळे मतदान करण्यास असमर्थता हे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि निवडणूकांचे स्वरुप अधिकाधिक प्रतिनिधीक करण्यासाठीच्या प्रयत्नातील एक प्रमुख अडचण असून त्या प्रमुख कारणाचे निराकरण करणे आवश्यक आहे. देशांतर्गत स्थलांतराबाबत कोणत्याही प्रकारचा केंद्रीभूत माहितीसाठा उपलब्ध नसला तरीही नोकरी, शिक्षण किंवा विवाहामुळे होणारे स्थलांतर हा देशांतर्गत स्थलांतराचा प्रमुख घटक असल्यामुळे  सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध असलेली विविध प्रकारची माहिती अंगुलीनिर्देश करीत आहे. एकूण देशांतर्गत स्थलांतराचा विचार केल्यास ग्रामीण भागातील लोकसंख्येचे बाह्य स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असून सुमारे ८५ % स्थलांतर हे राज्यांतर्गत होत असल्याचे आढळून आले आहे.

                            माहिती सौजन्य -: महासंवाद

1 टिप्पण्या

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने