जागरूक व्हा मतदार ! आता आधार क्रमांक मतदान कार्डशी जोडणे झाले अनिवार्य

            मतदार बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अनुषंगाने आपले मतदान कार्ड आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. ज्यामुळे मतदान यादी यांचे प्रमाणीकरण हे अचूक होऊन दुबार नावे ही संपुष्टात येऊन ,अचूक  मतदार यादी तयार करण्यासाठी हे मतदान कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड हे आपला अचूक ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. हे दोन्ही कार्ड एकमेकांना जोडले गेले तर त्यामुळे आपल्या आधार कार्ड ला एक दुय्यम ओळखपत्र म्हणून मतदान कार्डही एक अचूक ओळखपत्र म्हणून शासकीय कामासाठी उपयोगी पडेल व  मतदान ही योग्यच व्यक्तीचे होईल.


 महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अनुषंगा   ने   1 ऑगस्ट 2022 पासून एक अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये आपले आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करून घेणे जरुरीचे आहे व अचूक मतदान यादी तयार करण्यासाठी हे पाऊल निवडणूक विभागाने उचलले आहे. तेव्हा सुज्ञान मतदारांनी आपले मतदान कार्ड आधारशी लिंक करून घेणे जरुरीचे आहे.

एकदिवसीय शिबिराचे आयोजन

              याच अनुशंघाने  मतदान कार्ड आधार लिंक करण्यासाठी निवडणूक आयोगाने  येत्या 11 सप्टेंबर 2022 या तारखेला  राज्यव्यापी आधार जोडणी  एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. ज्यांनी कूणी आपले आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक केलेली नसेल, त्यांनी लवकरात लवकर या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर किंवा  मतदान अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपल्या आधार कार्ड चे  मतदान कार्डशी लिंक करून घ्यावे.

 स्वतःही करू शकतो नोंद 

* Google Play Store वर जाऊन voter helpline aap डाऊनलोड करावे

*Voter registration ला क्लिक करा

*फॉर्म 6B ला क्लिक करा

*Lets start ला क्लिक करा

*आपला मोबाइल नबर टाका

*OTP येईल तो टाका

*OTP टाकल्यानंतर verifay ला क्लिक करा

*Voter id असेल तर yes/have voter id ला क्लिक करा

*Voter id no टाका व राज्य Maharashtra निवडा

*नंतर proceed ला क्लिक करा

*आता तुमचा आधार नंबर टाका

*Done करा व confirm ला क्लिक करा

  अशा पद्धतीने तुमचे आधार ,मतदान कार्ड ला लिंक झाल्याचा मेसेज येईल . वरील प्रमाणे जागरूक मतदारांनी आपले आधार मतदान कार्ड शी लिंक करून घेणे अधिक माहिती साठी https://voterportal.eci.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.


2 टिप्पण्या

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने