काय आपण ? जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या निसर्गरम्य पर्यटन स्थळाना भेट दिली आहेत का?

           नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात आपण कामात एवढे गुंतून गेलो आहोत की आपल्याला कुठे जायला कुठे फिरायला फार वेळ कमी मिळत असतो, आणि आपण कधी कधी तो देतही नसतो.त्यामुळे आपले जीवन हे निरउत्साही बनते. कामात मन ही लागत नाही. त्यामुळे आपण  वेळ काढून कितीही महत्त्वाचं असलेलं काम बाजूला ठेवून एकदा फिरण्याचा बेत आखलाच पाहिजे. आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देऊन आपले मन फ्रेश करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. चला तर मग  आम्ही आपणास काही निसर्गरम्य स्थळांबाबत सांगणार आहोत . जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अजिंठा या डोंगर रांग भागातील अतिसुंदर निसर्गरम्य अशा स्थळांना आपण श्रावण महिन्यात जरूर भेट दिलीच पाहिजे. 


आमसरी 

आम सरी हे ठिकाण अजिंठा व बुलढाणा रोडवर शिवना या गावापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणी अंबऋषी महादेव मंदिर एक जागृत देवस्थान आहे.जे निसर्गरम्य परिसरात बनलेले आहे.हे मंदिर अंबऋषी महादेव मंदिर आहे आणि यामधील महादेवाची पिंड ही एका छोट्या गुहेमध्ये स्थापित आहे.आणि गुहेच्या बाहेरील बाजूस एक छोटा धबधबा आहे.येथे वरून पाणी पडताना पाहून मन उत्साही होते .आजूबाजूचा परिसर डोंगराळ भाग असल्याने आणि हे मंदिर  डोंगरांच्या मध्यभागात असल्याने एक वेगळाच निसर्ग अनुभव आनंद आपल्याला मिळतो. तेव्हा मित्रांनो आपण येथे जरूर भेट द्या


कालिंका माता गड  

अजिंठा व बुलढाणा रोडवरील वाढोना या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर कालिंका माता गड हे  निसर्गरम्य देवस्थान आहे. अजून तरी इथे काही सोयी सुविधांचा अभाव आढळतो ज्यामुळे  आपली गैरसोय होते परंतु हे मंदिर  अतिउच्च ठिकाणावर असल्याने येथील निसर्ग रम्य दृश्य पाहून आपण हे सर्व विसरून जातो. त्यामुळे आपण या स्थळाला आवर्जून भेट द्यावी .कारण येथील निसर्गरम्य दृश्य फारच नयनरम्य आणि सुंदर आहे. जेथे आपल्याला फोटो काढण्याच्या मोह आवरणार नाही.


श्री क्षेत्र जाळीचा देव

याच मार्गावर आपण जात असताना रस्त्यामध्येच जाळीचा देव हे महानुभव पंथातील भव्य मंदिर आपल्या आपल्या नजरेस पडते स्वामी चक्रधर स्वामी यांचे हे मंदिर आहे. चक्रधर स्वामी यांना महानुभव पंथातील लोक फार मानतात. जेव्हा आपण मंदिरात दर्शनात जातो तेव्हा या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता आपल्याला उल्हासित करते.दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागील बाजूस आपण गेलात तर आपणास निसर्गाचे आणखी मनमोहक सुंदर दृश्य दिसते .हा परिसर ही डोंगराळ भागात असल्याने येथील दृश्य फार विहंगम आहेत जे पाहून आपले मन उल्हासित होते. तेव्हा मित्रांनो वेळात वेळ काढून आपण या देवस्थान व निसर्गरम्य स्थळांना भेट नक्की द्या


टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने