आधार कार्ड साठी 1 ऑक्टोंबर पासून नवा नियम लागू देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव uidai ने घेतला हा निर्णय

   नमस्कार वाचक मित्र हो KJMEDIA तर्फे आमच्या या नवीन लेखात आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण uidai ने केलेल्या एका नवीन नियमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो 1 ऑक्टोंबर पासून लागू होणार आहे. या नवीन नियमाबद्दल जाणून घ्यायचे म्हटले तर ,हा नियम असा आहे की,1 ऑक्टोबर पासून आता 5 वर्षावरील लोकांचे नवीन आधार रजिस्ट्रेशन हे काही निवडक आधार सेंटरवरच होऊ शकेल.




                 आतापर्यंत हे रजिस्ट्रेशन अन्य कोणत्याही शासनमान्य आधार सेंटरवर होऊ शकत होते .परंतु हा नियम आता 1 ऑक्टोंबर पासून बंद होणार आहे. आतापर्यंत 18 वर्षा वरील व्यक्तींचे नवीन आधार रजिस्ट्रेशन हे 100 टक्क्यापेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे UIDAI ने  एक निवेदन जाहीर केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देशाला काही धोका निर्माण होऊ नये. म्हणून हा निर्णय घेतला आहे.

               uidai ने या निवेदनात असे म्हटले आहे की, 0 ते 5  वर्षापर्यंत लहान मुलांना नवीन आधार तयार करण्यासाठी प्राथमिकता दिली जाणारच आहे. पण 5 वर्षावरील व्यक्तींना  जिल्ह्या किंवा एका तालुका लेवल पर्यंत काही निवडक आधार केंद्रावरच  नवीन आधार रजिस्ट्रेशन होऊ शकणार आहे.

असे मानले जात आहे की बँका आणि पोस्ट ऑफिस येथील आधार सेंटरवर आता 5 वर्षावरील व्यक्तींचे नवीन आधार रजिस्ट्रेशन बंद होणार आहे.

      निवेदनात  डिपार्टमेंट ऑफ इन्फोरमेशन टेक्नॉलोजी एंड कम्युनिकेशन (डीओआईटी) च्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की जवळपास 134 करोड लोकांचे आधार रजिस्ट्रेशन झाले आहे. तर या मध्ये 100 टक्के लोक हे वयस्कर आहेत. अशामध्ये सरकार आता असे गृहीत धरून चालत आहे. की देशामध्ये आता 18 वर्षे वरील सर्व व्यक्तींचे आधार रजिस्ट्रेशन  झालेले आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका

 UIDAI ने या निवेदनात असे म्हटले आहे .की नवीन बोगस  आधार रजिस्ट्रेशननाणे  देशाला धोका निर्माण होऊ शकतो. या निर्णयाने देशांमध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या लोकांच्या नवीन आधार बनवण्याच्या प्रक्रियेला अंकुश लागेलं.

निवडक सेंटरवरच असेल नवीन आधार रजिस्ट्रेशन

UIDAI आपल्या प्रादेशिक कार्यालया मधून काही निवडक नवीन आधार सेंटरची यादी 30 सप्टेंबर पर्यंत जाहीर करणार आहे . हे आधार सेंटर कोठ कुठे असतील हे त्या जिल्ह्यातील आधार मॉनिटरिंग कमिटी जाहीर करणार आहे. या सेंटर वरील सर्व सिस्टम हे नवीन असणार आहे.आणि या सेंटरचे url व अशा अनेक गोष्टी नवीन असणार आहे. त्यामुळे या सर्वांची  माहिती प्रादेशिक कार्यालयात असणार आहे. या फक्त याच सेंटर वर (5 वर्षा खालील या व्यतिरिक्त ) 5 वर्षा वरील  व्यक्तींचे नवीन आधार रजिस्ट्रेशन होणार आहे.




2 टिप्पण्या

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने