भेसळ करत असाल तर ! सावधान जागेवरच होणार कारवाई ! वाचा सविस्तर !

 


                नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या या नवीन लेखांमध्ये  आपले स्वागत आहे. मित्रांनो आपणास  अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळते यामध्ये दूध ,अन्नधान्य किंवा मसाले चे पदार्थ असतात. यासारख्या अनेक गोष्टींमध्ये आपणास मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसत आहे. आणि आपण हे पदार्थ खाल्ल्यास आपणास आरोग्याचे अनेक दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे या भेसळ करणाऱ्या वर कारवाई व्हावी हे आपणास वाटते. परंतु आपण काही करू शकत नाही. म्हणून महाराष्ट्र शासन यावर वारंवार कारवाया करत असते. पण पाहिजे तशा कारवाया भेसळखोरावर वर होत नसतात. त्यामुळे या भेसळ खोरावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन शक्कल लढवली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र सरकार आता जागेवर एखादी पदार्थ  विकत असेल त्या जागेवरच त्या वस्तूचे मूल्यमापन करून ती भेसळ युक्त आहे किंवा नाही हे जाणून  भेसळखोरावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

      अन्नधान्य, दूध ,मिठाई यासारख्या पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते विशेषतः सणासुदीच्या काळात होत असते. या काळात होणारी कारवाई नंतरही या भेसळ खोरणा पूर्णतः रोखणे शक्य झालेले नाही. अशा भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कडक पावले उचलले आहे.भेसळ झालेल्या ठिकाणी पोचून जागेवरच भेसळयुक्त पदार्थांची तपासणी करण्यासाठी सरकार 18  मोबाईल प्रयोगशाळा खरेदी करीत आहे.  ही मोबाईल प्रो प्रयोगशाळा त्या ठिकाणी पोहोचून भेसळ खोरांचे पितळ उघंडे पडणार आहे.

                       तपासणीच्या या मोबाईल प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तक्रार देताच या प्रयोगशाळा त्या ठिकाणी पोहोचून अन्नपदार्थाची तपासणी करून तत्काळ अहवाल देणार आहेत. यापूर्वी भेसळीचा अहवाल येण्यास तीन महिने लागत होते. मात्र आता या प्रयोगशाळेत तत्काळ मिळणाऱ्या अहवालामुळे संबंधित व्यापाऱ्यावर जागेवरच कारवाईचा भडगा उभारणे शक्य होणार आहे. माहिती अशी प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.


अशाप्रकारे काम करणार

                      दोन जिल्ह्यांसाठी एक व्हण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्हन मध्ये दोन अन्न सुरक्षा अधिकारी दोन सहाय्यक यांची टीम कार्यरत असणार आहे. बाजारच्या ठिकाणी या व्हन  तैनात करण्यात येणार आहे.व्हणला बसवण्यात आलेल्या एलसीडीच्या माध्यमातून जनजागृती ही केली जाणार आहे.अन्नसुरक्षा नियम व भेसळ कशी ओळखायची याची माहिती बाजारात लोकांना देण्यात येणार आहे.

या होणार तपासण्या

# दुधा मधील भेसळ चहा पावडर मधील रंगाची भेसळ चटणी सदृश मसाले पदार्थ होणारी रंगांची भेसळ

# मध साखरेतील भेसळ अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी फळांची गुणवत्ता तपासणी द्वारे केली जाणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने