नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे.मित्रांनो आपणास माहीतच आहे की सध्या शेतकऱ्यांची प्रधानमंत्री कुसुम योजनेचा फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे . मागील वर्षी प्रधानमंत्री कुसुम योजना चा फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांची अशीच झुंबड उडाली होती.
शासनाने हे फॉर्म भरण्यासाठी काही काही अंतिम मुदत दिली होती. परंतु या मुदतीत फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती.यामध्ये एकाच वेळी या कुसुम योजनेच्या फॉर्म मधील वेबसाईटवर जास्त प्रमाणात फॉर्म अपलोड करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्या साईटचे सर्वर डाऊन झाले होते. काहींचे फॉर्म भरण्याचे अपूर्ण राहून गेले होते.परिणामी या परिस्थितीत अंतिम मुदत ही शेतकऱ्यांची संपून गेली होती. त्यामुळे काही शेतकरी प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेचे फॉर्म भरू शकले नव्हते. परंतु यावर्षी ही योजना परत चालू झाली आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची काम चालू झाले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता हे फॉर्म भरण्यासाठी लगबग करण्याची घाई करू नये. कारण आता शासनाने या योजनेसाठी कोणतीही अंतिम मुदत दिलेली नाही. त्यामुळे पूर्ण वेळ हे संकेतस्थळ चालू असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गडबड न करता हा फॉर्म सावकाश आपल्या सवडीने भरवा.
प्रधानमंत्री कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाऊर्जा ने पुन्हा सुरू केलेल्या अर्ज घेण्याच्या प्रक्रियेची वेळ अजून गेलेली नाही. मात्र मुदत संपेल म्हणून संकेतस्थळावर अनेक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी अर्ज केले जात असल्याने, संकेतस्थळ बंद पडत आहे. वास्तविक पाहता अर्ज करण्यास कसलीही अंतिम मुदत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता सावकाश अर्ज करावा असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.
राज्यातील आतापर्यंत 28 हजार 601 जणांनी अर्ज केला आहे.महाऊर्जाच्या संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. संकेतस्थळावर तांत्रिक भाग घेऊन ते बंद पडत असल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होत्या परिणामी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र या योजनेची आता अंतिम मुदत नसल्याने शेतकरी या योजनेचे केव्हाही अर्ज करू शकतात व हे संकेतस्थळ आता बंद होणार नसल्याने सावकाश अर्ज भरावे असे आव्हाहन महाऊर्जाकडून करण्यात आले आहे.
अंतिम मुदत नसल्याने संकेतस्थळ राहणार चालू
या संकेतस्थळाला आता अंतिम मुदत नसून, हे संकेतस्थळ आता बंद होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास पुरेसा कालावधी आहे. त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांची संख्या मर्यादित असल्यास ही अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असेही जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे.
काही ठळक महत्त्वाचे मुद्दे.
*या योजनेतून 90 व 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपाचे वाटप केले आहे.
*सप्टेंबर 2021 पासून सुरू असलेल्या या योजनेत आतापर्यंत 58 हजार पंप शेतकऱ्यांच्या शेतावर बसवण्यात आले आहे.
*पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी एक लाख पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
*महाऊर्जा ने पूर्वीच्या अर्जासह नव्याने अर्ज मागवण्यासाठी 17 मे पासून संकेतस्थळ सुरू केले आहे.
* राज्यभरातून शुक्रवार दिनांक 26 पर्यंत अर्ज भरता येत नसल्याच्या 280 तक्रारी आल्या आहेत.
*पुण्यातून सर्वाधिक 2 हजार 729 अर्ज दाखल.
माहिती सौजन्य:- दैनिक e लोकमत