ग्रामपंचायतीचे दाखले आता मिळणार ग्राम वासियांना घरबसल्या ! महाराष्ट्र सरकारची नवीन ॲप द्वारे होणार कामे ! वाचा सविस्तर!




      नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखांमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण ग्रामपंचायतीच्या एका नवीन सुविधेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे आता महाराष्ट्र सरकारने  एक नवीन ॲप तयार केले आहे. ज्यामध्ये आपल्याला घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व प्रमाणपत्रे  भेटणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकाराचे दाखले परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा - ई - ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप विकसित केले आहे . यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवेसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे . ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा जन्म दाखला , विवाह नोंदणी दाखला , मालमत्तेसंबंधीचे उतारे तसेच घरपट्टी , पाणीपट्टी , कर भरणा करायचा असल्यास ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची गरज आता राहणार नाही . 

 घरबसल्या मिळणार दाखले

             महाराष्ट्र सरकारने महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप सुरू केले आहे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये चकरा माराव्या लागतात . प्रत्येक वेळी आपल्याला दाखला वेळेवर मिळेलच याची शाश्वती नसते . त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे . गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप्लिकेशन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे .


ग्रामपंचायतीलाही होणार मदत

             

 ■आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेले पदाधिकारी म्हणजेच सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक , कर्मचारी यांची माहितीसुद्धा यात असणार आहे .

 

 ■ याव्यतिरिक्त आपले सरकार सुविधा आणि सूचनापेटी असे वेगवेगळे पर्यायसुद्धा यात देण्यात आले आहेत . या सर्व पर्यायांचा वापर करून आपण आपल्या ग्रामपंचायतमधील वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता . 

 ■ या ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा घरपट्टी , पाणीपट्टी व इतर कर वसूल करणे सोयीचे होणार आहे . शिवाय ही वसूल होणारी रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होणार आहे.

 ■ ॲपवरून मिळणार अनेक सेवा महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट अपवरून नागरिकांना जन्म प्रमाणपत्र , मृत्यू प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र , दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र , असेसमेंट उतारा मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे . 

 ■तसेच या अपवरून मिळकतींना लागणारा कर घरबसल्या बघता येईल . भरलेल्या कराची स्थिती यावर पाहता येणार आहे . या अपमुळे नागरिकांना घरबसल्या दाखले मिळणार आहे . त्याचबरोबर ग्रामपंचायतींनाही विविध कर आकारणीची ऑनलाइन सुविधा मिळणार आहे . या माध्यमातून जमा होणारा पैसा हा थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होणार आहे 

अशी करा नोंदणी 

                   प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड केल्यावर त्यात नाव , लिंग , जन्म तारीख . मोबाईल नंबर , ई - मेल आयडी ही माहिती भरून नोंदणी करावी . त्यानंतर संबंधित व्यक्तीला युजर नेम आणि पासवर्ड प्राप्त होणार . त्यानंतर विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रासाठी या ॲपमधून अर्ज करता येणार आहे . ते अर्ज थेट ग्रामपंचायत कार्यालयात दाखल होतील. 




टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments 🙏

थोडे नवीन जरा जुने