नमस्कार मित्रांनो KJMEDIA च्या नवीन माहिती लेखामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज अनेक उद्योजक पुरुष आपल्या उद्योग व्यवसायात फार यशस्वी झाले आहेत परंतु या उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यामागे पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो अशी एक म्हण आहे. यामुळेच आज घडीला अनेक पुरुष आपल्या स्त्री साथीदारामुळे अनेक मोठमोठे उद्योग सांभाळत आहे. हे उद्योग करत असताना स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योग व्यवसाय करत आहे परंतु हे उद्योग करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी पैशाची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सरकारी बँकांच्या सहकार्याने योजना राबवून कमी व्याजदराने व्यावसायिक उद्योजकांना कर्ज स्वरूपात मदत करत असतात.यामुळे अनेक उद्योजक यशस्वी झालेले आहेत .
आता केंद्र सरकारने महिलांनाही उद्योगात पुढे आणण्यासाठी महिलांसाठीही एक कर्ज योजना नुकतीच जाहीर केली आहे.यामध्ये उद्योग व्यवसायासाठी 5 लाखापर्यंतचे कर्ज विना तारण देणार असल्याचे महिला दिनाचे अवचित्य साधून केंद्र सरकारने जाहीर केले आहे .
"स्त्री शक्ती पॅकेज योजना" असे आहे योजनेचे नाव
उद्योगात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला उद्योजिका दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने एक नवीन धमाकेदार योजना शनिवारी जाहीर केली . यापुढे महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत स्वस्त व्याजदरात विनातारण कर्ज दिले जाईल . कर्जाची कमाल मर्यादा २५ लाख रुपये असेल . पुरुषांच्या तुलनेत उद्योग , व्यवसायात महिला अत्यंत मागे आहेत . पुरुषांच्या बरोबरीने या क्षेत्रातही महिलांची संख्या जास्त प्रमाणात व्हावी म्हणून केंद्राने ही ' स्त्री शक्ती पॅकेज योजना ' आणली आहे . या योजनेने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार असून,
योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शी केंद्र सरकारने केला सहकार्य करार
व्यवसाय कर्जमर्यादा उद्योगाची दालने या निम्म्या महिला लोकसंख्येसाठी खुली होणार आहेत .महिला क्षेत्रातही या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरु करण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे . विशेष म्हणजे या योजने अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी महिलांना काहीही तारण म्हणून ठेवण्याची गरज नाही . या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ' स्टेट बँक ऑफ इंडिया ' या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेसोबत सहकार्य करार केला आहे . या बँकेच्या शाखा देशभरात सर्वत्र असल्याने देशभरातील महिलांना वेळेवर कर्ज पुरवठा करणे शक्य होणार आहे
योजनेच्या अटी काय ?
■ योजनेचा लाभ मिळवायचा तर आधार कार्ड , निवडणूक ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील , ई - मेल आयडी , मोबाईल क्रमांक , तसेच उद्योगसंबंधीची सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासह सादर करावी लागतील.
■ कोणत्याही उद्योगात संबंधित ( अर्जदार | महिलेची किमान ५० टक्के मालकी / भागीदारी आवश्यक असेल . उद्योग / व्यवसाय तसेच निगडित कागदपत्रे महिलेच्या नावावर नसतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही .